DC vs RR: IPL 2020: अखेरच्या षटकापर्यंत रंगलेल्या सामन्यात राजस्थानवर दिल्लीचीच बाजी – dc vs rr: delhi capitals beat rajasthan royals by means of 13 runs


दुबई : कर्णधार श्रेयस अय्यर दुखापतीमुळे मैदानात नसतानाही दिल्ली कॅपिटल्सने राजस्थान रॉयल्वर दमदार विजय मिळवला. दिल्लीने यावेळी राजस्थानपुढे विजयासाठी १६२ धावांचे आव्हान ठेवले होते. पण राजस्थानच्या फलंदाजांना या धावसंख्येचा यशस्वी पाठलाग करता आला नाही. त्यामुळेच दिल्लीने आजच्या सामन्यात १३ धावांनी विजय मिळवला.

दिल्लीच्या आव्हानाचा पाठलाग करताना राजस्थानला जोस बटलरने झंझावाती सुरुवात करून दिली. पण बटलरला यावेळी मोठी खेळी साकारता आली नाही. बटलरने यावेळी ९ चेंडूंत तीन चौकार आणि एका षटकारासह २२ धावा लुटल्या. बटलर बाद झाल्यावर फलंदाजीला आलेल्या स्टीव्हन स्मिथला यावेळी फक्त एकच धाव करता आली. आर. अश्विनने त्याला तंबूचा रस्ता दाखवला.

स्मिथ बाद झाल्यावर सलामीवीर बेन स्टोक्स आणि संजू सॅमसन यांनी काही काळ चांगली फलंदाजी केली. या दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी ४६ धावांची भागीदारी रचली. पण दिल्लीकडून पहिलाच सामना खेळणाऱ्या तुषार देशपांडेने ही जोडी फोडली. स्टोक्स तुषारच्या गोलंदाजीवर मोठा फटका मारण्यासाठी गेला. पण त्याचा हा फटका हुकला आणि दिल्लीला यावेळी मोठे यश मिळाले. स्टोक्सने यावेळी ३५ चेंडूंत सहा चौकारांच्या जोरावर ४१ धावा केल्या.

स्टोक्स बाद झाल्यावर संघाची जबाबदारी ही संजूवर होती. पण त्यानंतर संजूला जास्त काळ खेळपट्टीवर तग धरून राहता आले नाही. अक्षर पटेलने यावेळी संजूला त्रिफळाचीत केले. संजूने यावेळी दोन षटकारांच्या जोरावर १८ चेंडूंत २५ धावा केल्या. संजू बाद झाल्यावर आतापर्यंत फॉर्मात नसलेल्या रॉबिन उथप्पाने दमदार फलंदाजीचा नमुना पेश केला. पण मोक्याच्या क्षणी उथप्पा बाद झाला आणि राजस्थानवर दडपण वाढले. उथप्पाने यावेळी २७ चेंडूंत ३२ धावा केल्या.

दिल्ली कॅपिटल्सच्या शिखर धवन आणि कर्णधार श्रेयस अय्यर यांनी राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या सामन्यात अर्धशशतके झळकावली. या दोघांनी यावेळी राजस्थानच्या गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली. धवन आणि अय्यर यांच्या अर्धशतकांच्या जोरावरच दिल्लीला राजस्थानपुढे १६२ धावांचे आव्हान ठेवता आले. दिल्लीने आजच्या सामन्यात नाणेफेक जिंकली आणि प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पण यावेळी दिल्लीची सुरुवात चांगली झाली नाही. कारण पहिल्याच चेंडूवर त्यांना पृथ्वी शॉच्या रुपात मोठा धक्का बसला. त्यानंतर अजिंक्य रहाणे हा फलंदाजीला आला होता. पण अजिंक्यलहा या सामन्यातही मोठी खेळी साकारता आली नाही. अजिंक्यला या सामन्यात २ धावाच करता आल्या.

पृथ्वी आणि अजिंक्य हे दोन धक्के बसल्यावर दिल्लीचा कर्णधार श्रेयस अय्यर फलंदाजीला आला. यावेळी धवन आणि अय्यर यांच्यामध्ये चांगली भागीदारी झाल्याचेही पाहायला मिळाले. या दोघांनी यावेळी तिसऱ्या विकेटसाठी ८५ धावांची महत्वपूर्ण भागीदारी रचली आणि संघाच्या धावसंख्येला चांगला आकार दिला. धवनने यावेळी अर्धशतकही झळकावले. पण अर्धशतक झळकावल्यावर धवनला जास्त काळ खेळपट्टीवर पाय रोवून फलंदाजी करता आली नाही. धवनने यावेळी ३३ चेंडूंत सहा चौकार आणि दोन षटकारांच्या जोरावर ५७ धावांची खेळी साकारली. दिल्लीच्या संघातील ही सर्वोत्तम धावसंख्या ठरली.

धवन बाद झाल्यावर संघाची सर्व जबाबदारी श्रेयस अय्यरने आपल्या खांद्यावर घेतली. अय्यरने यावेळी षटकार लगावत आपले अर्धशतक साजरे केले. पण अर्धशतक झळकावल्यावर अय्यर जास्त काळ फलंदाजी करू शकला नाही. अय्यरला यावेळी राजस्थानच्या कार्तिक त्यागीने जोफ्रा आर्चरकरवी झेलबाद केले. अय्यरने यावेळी ४३ चेंडूंत ३ चौकार आणि दोन षटकारांच्या जोरावर ५३ धावांची खेळी साकारली. अय्यर बाद झाल्यावर मार्कस स्टॉइनिसला यावेळी धडाकेबाज फलंदाजी करता आली नाही. मार्कसला यावेळी १९ चेंडूंत १८ धावा करता आल्या. जर मार्कसने धडाकेबाज फलंदाजी केली असती तर दिल्लीचा संघा १७०-१८० धावांपर्यंत पोहोचू शकला असता, पण यावेळी मार्कस अपयशी ठरल्याचेच पाहायला मिळाले.Source link

Related Articles

France raises considerations with Pakistan over stunning commentary of Minister Shireen Mazari | पाकिस्तानी मंत्री के ‘नाज़ी’ वाले ट्वीट पर फ्रांस ने जताया विरोध,...

नई दिल्ली: फ्रांस सरकार ने पाकिस्तान की मानवाधिकार मंत्री शिरीन मजारी के बयान पर चिंता जताई है. फ्रांस के विदेश मंत्रालय ने इस्लामाबाद...

Local weather Trade Will have to Be Fought In Built-in, Holistic Method

<!-- -->Climate change must be fought not in silos but in an integrated, comprehensive and holistic way: PM ModiNew Delhi/Riyadh: Climate change must...

India vs Australia: Toss-up between Mayank Agarwal and Shubman Gill as Shikhar Dhawan’s opening spouse | Cricket Information

SYDNEY: The Indian team management will think over the ideal opening combination for the upcoming three-match ODI series against Australia, with a toss-up...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

20,764FansLike
2,445FollowersFollow
16,800SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles

France raises considerations with Pakistan over stunning commentary of Minister Shireen Mazari | पाकिस्तानी मंत्री के ‘नाज़ी’ वाले ट्वीट पर फ्रांस ने जताया विरोध,...

नई दिल्ली: फ्रांस सरकार ने पाकिस्तान की मानवाधिकार मंत्री शिरीन मजारी के बयान पर चिंता जताई है. फ्रांस के विदेश मंत्रालय ने इस्लामाबाद...

Local weather Trade Will have to Be Fought In Built-in, Holistic Method

<!-- -->Climate change must be fought not in silos but in an integrated, comprehensive and holistic way: PM ModiNew Delhi/Riyadh: Climate change must...

India vs Australia: Toss-up between Mayank Agarwal and Shubman Gill as Shikhar Dhawan’s opening spouse | Cricket Information

SYDNEY: The Indian team management will think over the ideal opening combination for the upcoming three-match ODI series against Australia, with a toss-up...

Paris Local weather Accord Designed To Kill American Economic system

<!-- -->Trump had given a one-year notice to leave the Paris accord on November 4, 2019. (File)Riyadh: US President Trump on Sunday defended...

pune information Information : Ajit Pawar: शरद पवारांबद्दलचं ‘ते’ विधान; ‘चंपा’ म्हणत अजितदादांचा चंद्रकांत पाटलांवर वार – deputy cm ajit pawar goals chandrakant patil

पुणे: 'शरद पवार साहेबांचे महाराष्ट्राच्या जडणघडणीमध्ये मोठे योगदान आहे. देश पातळीवर निर्णय घेतानाही त्यांच्याशी चर्चा केली जाते. त्यामुळेच 'चंपा'चे वक्तव्य म्हणजे सूर्यावर थुंकण्यासारखे...