Suvrat Joshi: गोष्ट एका पैठणीचीः सुव्रत जोशीने लंडनमध्ये केला ‘जुगाड’ – goshta eka paithanichi actor suvrat joshi dubbed in london

मुंबई- करोनाच्या या काळात अडथळ्यांवर मात करत खूप वेगवेगळ्या प्रकारे काम सुरू आहे. अभिनेता सुव्रत जोशीनंही अशाच प्रकारे डबिंगचं एक काम पूर्ण केलं, तेही लंडनहून. लॉकडाउनपूर्वी चित्रीत केलेल्या ‘गोष्ट एका पैठणीची‘ या चित्रपटातलं त्याचं डबिंग राहिलं होतं. ते त्यानं चक्क लंडनमध्ये असताना पूर्ण करून दिलं. लंडनच्या त्या डबिंग स्टुडिओतील तंत्रज्ञ बांगलादेश आणि पोलंडचे होते. या डबिंगवेळी दिग्दर्शक शंतनू रोडे ‘झूम’द्वारे ऑनलाइन उपस्थित असायचे.

शाहिदला कपूरला एक- दोन नाही तर पूर्ण ८ कोटींचा बसला फटका

शंतनू यांनी चित्रपटाचं लेखन आणि दिग्दर्शन केलं आहे. चित्रपटात सायली संजीव, सुव्रत जोशी, शशांक केतकर, मिलिंद गुणाजी आदी कलाकारांच्या मुख्य भूमिका आहेत. चित्रपटाचं चित्रीकरण लॉकडाऊनपूर्वीच पूर्ण झालं होतं. सरकारनं अनलॉकिंग सुरू केल्यावर चित्रपटाच्या डबिंगची प्रक्रिया सुरू करण्यात आली. त्यानुसार बाकी सर्व कलाकारांचं डबिंग पूर्ण झालं. मात्र सुव्रत लंडनमध्ये अडकल्यानं त्याला मुंबईत येऊन डबिंग करणं शक्य नव्हतं.

काय करावं असा प्रश्न पडलेला असताना अखेर आधुनिक तंत्रज्ञानामुळे या अडचणीवर मार्ग निघाला, असं चित्रपटाचे निर्माते अक्षय बर्दापूरकर यांनी सांगितलं. लंडनमध्ये डबिंग करण्याविषयी सुव्रत म्हणाला, ‘माझ्या नाटकाच्या दौऱ्यासाठी मी अमेरिकेला गेलो होतो. पण, करोना संसर्गामुळे दौरा स्थगित करावा लागला आणि मी लंडनला गेलो. त्यामुळे माझं ‘गोष्ट एका पैठणीची’ चित्रपटाचं डबिंग करता येत नव्हतं.

सुव्रत जोशी

निर्मात्यांनी धाडसी निर्णय घेऊन मला लंडनमध्ये डबिंग करायला सांगितलं. त्यानुसार लंडनमध्ये एक स्टुडिओ शोधला आणि डबिंग पूर्ण केलं. या डबिंगसाठी दिग्दर्शक शंतनू रोडे झूमद्वारे ऑनलाइन उपस्थित असायचे. स्टुडिओतले तंत्रज्ञ परदेशी असल्यामुळे त्यांना मराठी येण्याचा प्रश्नच नव्हता. त्यामुळे भाषेचा अडथळा येत होता. पण, त्यातूनही डबिंग उत्तम पद्धतीनं झालं हा अनुभव खरोखरच वेगळा होता.’Source link

Related Articles

Bihar Election 2020: Gaya The Salvation Land Yearning Building – बिहार का रण- गयाः विकास को तरसती मोक्ष भूमि

ज्ञान और मोक्ष की भूमि गया के पौराणिक वैभव के बावजूद पर्यटन के लिहाज से अपेक्षित विकास न हो पाने से यहां के...

Oldsters belonging to those zodiac indicators are maximum pleasant with their youngsters

When it comes to Leos, they can be extremely protective towards their children. Protective, not in terms of depriving their kids from experiencing...

Congress “Synonymous” With Anti-Nationwide Forces, Alleges BJP

The opposition's job is to criticise the government, not weaken country, Gaurav Bhatia said (File)New Delhi: The BJP on Wednesday alleged that the...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

20,764FansLike
2,390FollowersFollow
16,700SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles

Bihar Election 2020: Gaya The Salvation Land Yearning Building – बिहार का रण- गयाः विकास को तरसती मोक्ष भूमि

ज्ञान और मोक्ष की भूमि गया के पौराणिक वैभव के बावजूद पर्यटन के लिहाज से अपेक्षित विकास न हो पाने से यहां के...

Oldsters belonging to those zodiac indicators are maximum pleasant with their youngsters

When it comes to Leos, they can be extremely protective towards their children. Protective, not in terms of depriving their kids from experiencing...

Congress “Synonymous” With Anti-Nationwide Forces, Alleges BJP

The opposition's job is to criticise the government, not weaken country, Gaurav Bhatia said (File)New Delhi: The BJP on Wednesday alleged that the...

wild elephant damage farms in kolhapur district: जंगली हत्तींचा धुमाकूळ; परतवण्यासाठी राबवणार ‘हा’ पॅटर्न – wild elephant damage farms in kolhapur district

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर: कोल्हापूर जिल्ह्यातील सहा तालुक्यात पाच हत्तींनी धुमाकूळ घातला आहे. कर्नाटकातून येणाऱ्या या हत्तींनी परतीचे नाव न घेता मुक्कामच ठोकल्याने...

Mohammed Siraj: IPL 2020: रिक्षावाल्याच्या मुलाने रचला आयपीएलमध्ये इतिहास, पाहा मोहम्मद सिराजची संघर्षपूर्ण कहाणी – Tale Of Rickshaw Drivers Son Who Made Historical past...

केेकेआरविरुद्धच्या सामन्यात आरसीबीचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजने इतिहास रचला. आतापर्यंत आयपीएलमध्ये जे कोणालाही करता आले नाही ते सिराजने करून दाखवले. एका रिक्षावाल्याचा मुलगा...