Covid-19 Vaccine Trials In Mumbai KEM Hospital By Friday | Corona Vaccine


मुंबई : खऱ्या अर्थाने आज मुंबईत कोरोना विरोधातील लशीचा अनुभव ‘मुंबईकरांनी’ घेतला. हो, आजपासून ब्रिटनच्या ऑक्सफर्ड विद्यापीठाने निर्माण केलेल्या लशीच्या मानवी चाचण्याची सुरुवात केइएम रुग्णालयात सुरु झाली आहे. आज पहिल्या दिवशी केवळ तीन जणांना लस टोचली जाणार आहे. येत्या 15 दिवसांत ही मानवी चाचणी पूर्ण करण्यात येणार आहे. या ट्रायलमध्ये 100 स्वयंसेवकांवर ही चाचणी करण्यात येणार आहे. यामध्ये स्वयंसेवकांसोबत गुप्तता पाळण्याबाबत करार करण्यात आला आहे, त्यामुळे त्याचे नाव आणि व्यवसाय याबाबतची कमालीची गुप्तता पाळण्यात आली आहे.

काही दिवसापूर्वी या चाचण्यांमध्ये लंडन येथील मानवी चाचण्यांत सहभागी झालेल्या एका व्यक्तीला त्रास झाल्याने ह्या चाचण्या काही काळापुरत्या थांबविण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र, या आठवड्यापासून या कामास सुरुवात करण्यात आली. आज लस टोचली गेली आहे. ऑक्सफर्ड विद्यापीठाचा भारतातील पुण्याच्या सिरम इन्स्टिट्यूटशी उत्पादन करण्याकरिता करार झाला आहे. त्यामुळे भारतातील या लसीच्या मानवी चाचण्या महाराष्ट्रात काही रुग्णालयात करण्यात येणार आहे. यामध्ये प्रामुख्याने मुबंईत, महापालिकेच्या अखत्यारीतील नायर आणि केइएम रुग्णालयात या चाचण्या करण्यात येणार आहे.

Covid-19 vaccine | कोरोनावर भारतीय लस राहणार ‘इतकी’ टक्के प्रभावी; आयसीएमआरची माहिती

याप्रकरणी, केइएम रुग्णालायचे अधिष्ठाता डॉ. हेमंत देशमुख यांनी एबीपी माझा डिजीटलशी बोलताना सांगितले कि, “आज पहिल्या दिवशी केवळ तीन स्वयंसेवकांना ही लस टोचण्यात येणार आहे. त्यापैकी एकाला लस देऊन झाली आहे. या स्वयंसेवकाच्या ओळखीबाबत गुप्तता पाळण्यात येणार आहे. तसा करार करण्यात आला आहे. जे कुणी पात्र स्वयंसेवक होते त्यांना मानवी चाचणी करण्याकरिता बोलविण्यास आजपासून सुरुवात केली आहे. त्यांना लस दिल्यानंतर सुद्धा एक तास थांबिविले जाते आणि मगच घरी पाठविले जाते. लस टोचणी करता आमचे विविध शाखेचे या कामाशी संबंधित डॉक्टर येथे उपस्थित असतात.”

ते पुढे असेही म्हणाले कि, “या चाचणीत 100 पैकी 20 जणांना प्लॅसिबो (कोणतेही औषध नसते त्या वाइल्समध्ये ) लस देण्यात येणार आहे. परंतु, हे आम्हालाही माहिती नाही कोणत्या वाइल्स मध्ये प्लॅसिबो लस आहे. फक्त कोडींग नंबर आहे तो त्या स्वयंसेवकाच्या पुढे टाकण्यात येणार आहे. ह्या वाइल्स जेथून आल्या आहेत. तेथूनच अशा प्रकारचे 100 डोस पाठविण्यात आल्या आहे. प्लॅसिबो लस ठेवण्यामागे तुलनात्मक अभ्यास करणे शक्य होते. एक काळानंतर ह्याची सर्वांची चाचणी करण्यात येते. या मानवी चाचणीची सर्व माहिती आम्ही आयसीएमआरला (ICMR) देणार आहोत. ते आणि आम्ही याचा अभ्यास करू. अशा पद्धतीने ट्रायल घेण्याचा अनुभव आमच्या रुग्णालयातील डॉक्टरांना आहे.”

Corona Vaccine : कोरोनाविरोधी तिसऱ्या टप्प्यातील लस चाचणीला KEM रुग्णालयात सुरुवात

अ‍ॅस्ट्रॅजेनेका या ब्रिटिश बायोफार्मसुटिकल्स कंपनीने ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या सहकार्याने संशोधन केले आहे. या लसीचा पहिला आणि दुसरा मानवी चाचण्यांचा टप्पा पार पडला होता. या लशीच्या तिसऱ्या टप्प्यास सुरुवात करण्यात आली होती. मात्र, ही लस घेतलेल्या व्यक्तीस या लसीचे दुष्परिणाम जाणवू लागल्याने चाचण्या थांबविण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, तो अडथळा आता दूर झाला आहे.

ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी बनवत असलेल्या कोरोना लसीची दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यातील मानवी चाचण्याकरिता देशातील 10 संस्थांची निवड केली आहे. याकरिता 1600 निरोगी व्यक्तींची निवड करण्यात येणार आहे. भारतातील 10 संस्थांपैकी मुंबईतील केइएम आणि नायर रुग्णालयाची निवड करण्यात आली होती. प्रत्येकी केंद्रावर 100 निरोगी स्वयंसेवकांवर या लसीच्या चाचण्या करण्यात येणार आहे. या स्वयंसेवकात 20 ते 50 वयोगटातील नागरिकांची निवड करण्यात आली आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव सुरु झाल्यानंतर दोन-तीन महिन्यानंतर अनेक परदेशी औषधं निर्माण करणाऱ्या कंपन्यांनी लस काढत असल्याचे दावे केले होते. त्यापैकी प्रत्यक्षात काही कंपन्यांनी काम सुरु केले असून पहिल्या टप्प्याच्या चाचण्यांचे निकाल विज्ञान जगतासमोर ठेवले होते, तर दुसऱ्या आणि तिसऱ्या मानवी चाचण्यांच्या टप्प्याचे काही कंपन्यांचे कामही सुरु झाले आहे.

WEB EXCLUSIVE | भारत बायोटेकची कोवॅक्सिन लस डिसेंबर-जानेवारीत : डॉ. गिल्लूरकरSource link

Related Articles

Kolhapur Information : Meghraj bhosale: ‘ही’ खेळी सुशांत शेलार यांची!; मेघराज भोसले यांचे गंभीर आरोप – meghraj bhosale goals sushant shelar and varsha usgaonkar

कोल्हापूर: 'आतापर्यंत त्यांनी केलेला भ्रष्टाचार लपवण्यासाठी व केसेस मागे घेण्यासाठीच आठ संचालकांनी आपल्याविरोधात मतदान केले, आपल्यावर घटनेत नसतानाही अविश्वास ठराव आणला, त्यामुळे या...

BMC demolition of Kangana house unlawful, malafide: HC | India Information

MUMBAI: The Bombay high court on Friday held that the BMC’s action of razing renovations in actor Kangana Ranaut’s...

સરકારની કિલ્લેબંધીનો ફિયાસ્કો : ખેડૂતો દિલ્હીમાં પ્રવેશ્યા

પોલીસે ધરતીપુત્રોને અટકાવવા ટ્રકો, મોટા કન્ટેનર, કાંટાના તાર, વોટર કેનન, આંસુ ગેસના શેલ સહિતનો ઉપયોગ કર્યો  ખેડૂતોએ આખા કન્ટેનર ઉથલાવ્યા, ટ્રેક્ટરથી બેરિકેડ્સ હટાવ્યા,...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

20,764FansLike
2,456FollowersFollow
16,800SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles

Kolhapur Information : Meghraj bhosale: ‘ही’ खेळी सुशांत शेलार यांची!; मेघराज भोसले यांचे गंभीर आरोप – meghraj bhosale goals sushant shelar and varsha usgaonkar

कोल्हापूर: 'आतापर्यंत त्यांनी केलेला भ्रष्टाचार लपवण्यासाठी व केसेस मागे घेण्यासाठीच आठ संचालकांनी आपल्याविरोधात मतदान केले, आपल्यावर घटनेत नसतानाही अविश्वास ठराव आणला, त्यामुळे या...

BMC demolition of Kangana house unlawful, malafide: HC | India Information

MUMBAI: The Bombay high court on Friday held that the BMC’s action of razing renovations in actor Kangana Ranaut’s...

સરકારની કિલ્લેબંધીનો ફિયાસ્કો : ખેડૂતો દિલ્હીમાં પ્રવેશ્યા

પોલીસે ધરતીપુત્રોને અટકાવવા ટ્રકો, મોટા કન્ટેનર, કાંટાના તાર, વોટર કેનન, આંસુ ગેસના શેલ સહિતનો ઉપયોગ કર્યો  ખેડૂતોએ આખા કન્ટેનર ઉથલાવ્યા, ટ્રેક્ટરથી બેરિકેડ્સ હટાવ્યા,...

Trinamool Chief On Suvendu Adhikari’s Resignation

<!-- -->Suvendu Adhikari resigned from ministerial post in Mamata Banerjee's Cabinet on Friday (File)Kolkata: Following Suvendu Adhikari's resignation from Mamata Banerjee's Cabinet in...

60 ટકા લોકો માસ્ક ગળામાં લટકાવી માત્ર દેખાડો કરે છેઃ સુપ્રીમ

સુપ્રીમકોર્ટે દેશમાં કોરોનાના વધી રહેલા કેસો અંગે ચિંતા વ્યક્ત કરી. કહ્યું કે કેન્દ્ર સરકાર ગાઈડ લાઈન જાહેર કરી ચૂકી છે પરંતુ માત્ર તેમ...