Sambhaji Raje: Sambhaji Raje: संभाजीराजेंनी वेळीच ओळखली चाल; ‘असा’ उधळला डाव! – do not politicize the maratha reservation issue says sambhaji raje

कोल्हापूर:मराठा आरक्षण प्रश्नावरून कोल्हापूर महापालिकेची सभा तहकूब करताना शुक्रवारी राजकारण चांगलेच रंगले. विरोधी आघाडीवर कुरघोडी करत सभा तहकुबीसाठी सत्ताधारी आघाडीने थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भूमिकेचा वापर केला, पण खासदार संभाजीराजेंनी तो परतवून लावल्याने सत्ताधारी आघाडीचा डाव त्यांच्याच अंगलट आला. दिवसभर झालेल्या या राजकीय डाव प्रतिडावाची चर्चा मात्र कोल्हापुरात चांगलीच रंगली. ( Sambhaji Raje On Maratha Reservation )

वाचा: मराठा समाजाच्या गोलमेज परिषदेत १५ ठराव; आता सरकारची कसोटी

कोल्हापूर महापालिकेत काँग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेना अशी महाविकास आघाडी सत्तेवर आहे. शुक्रवारी महापालिकेची सर्वसाधारण सभा होती. मराठा आरक्षण प्रश्नावर सरकार न्यायालयात भूमिका मांडण्यास कमी पडल्याने न्यायालयाने आरक्षणाला स्थगिती दिली, असा आरोप करत विरोधी भाजप व ताराराणी आघाडीने सभा तहकूब करण्याची मागणी केली. मराठा आरक्षण प्रश्नावर सभा तहकूब करायला सत्ताधारी आघाडीचा विरोध नव्हता, पण सरकारवर आरोप करत हा निर्णय घेण्यात त्यांच्यासमोर अडचण आली. राज्यात आपल्याच पक्षाची आघाडी सत्तेवर असल्याने त्याला विरोध करत सभा कशी तहकूब करायची, असा प्रश्न सत्ताधारी नगरसेवकांना पडला. त्यातून त्यांनी भन्नाट कारण पुढे करत सभा तहकूब केली.

वाचा: मराठा समाज आता एकटा नाही, मी सोबत आहे; उदयनराजे कडाडले

मराठा आरक्षण प्रश्नी राज्यातील खासदारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे चर्चेसाठी वेळ मागितली होती. याचे नेतृत्व खासदार संभाजीराजे करणार होते. पण पंतप्रधानांनी चर्चेला वेळ दिली नाही. पंतप्रधानांना मराठा आरक्षण प्रश्नात रस नाही, त्यामुळेच त्यांनी चर्चेला वेळ दिली नाही असे सांगत या घटनेच्या निषेधार्थ ही सभा तहकूब करत असल्याचे महापौर निलोफर आजरेकर यांनी जाहीर केले. ही बाब खासदार संभाजीराजे यांना कळताच त्यांनी पत्रक काढत महापालिकेतील सत्ताधारी आघाडीवर निशाणा साधला. मराठा आरक्षण प्रश्नात राजकारण करू नका, पंतप्रधान आपल्याला कधीही वेळ देऊ शकतात, त्यांच्याशी आपण कधीही वैयक्तिक चर्चा करू शकतो, त्यामुळे आपल्या भेटीचे राजकारण कशाला करता असा सवाल त्यांनी केला.

सत्ताधारी आघाडीने विरोधकांचा डाव उलटवण्यासाठी सभा तहकुबीचे कारण बदलले. मात्र नंतर संभाजीराजे यांनी त्यांचा डाव उलटवला. दिवसभर घडलेल्या या राजकारणाची चर्चा कोल्हापुरात चांगलीच रंगली.

वाचा: भाजप सरकारकडून विचारांची हत्या; ‘या’ मुद्द्यावर गणेश देवींचा संतापSource link

Related Articles

farmers protest Delhi: शेतकऱ्यांचे आंदोलन चिरडणे अमानुषपणाचे, मान्यवर साहित्यिकांची सरकारवर टीका – farmers protest delhi writers slams central executive

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद: दिल्लीत आंदोलक शेतकऱ्यांशी सरकारने ( farmers protest ) तातडीने संवाद साधावा. दिल्लीत निर्धाराने एकवटलेल्या शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहणे...

Marrying individual of selection elementary proper: Karnataka HC | India Information

BENGALURU: The Karnataka high court has said it was well settled that the “right of any major individual to marry the...

'मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देऊ नको', महात्मा फुले समता परिषदेचं आंदोलन, जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

'मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देऊ नको', महात्मा फुले समता परिषदेचं आंदोलन, जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

20,764FansLike
2,464FollowersFollow
16,900SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles

farmers protest Delhi: शेतकऱ्यांचे आंदोलन चिरडणे अमानुषपणाचे, मान्यवर साहित्यिकांची सरकारवर टीका – farmers protest delhi writers slams central executive

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद: दिल्लीत आंदोलक शेतकऱ्यांशी सरकारने ( farmers protest ) तातडीने संवाद साधावा. दिल्लीत निर्धाराने एकवटलेल्या शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहणे...

Marrying individual of selection elementary proper: Karnataka HC | India Information

BENGALURU: The Karnataka high court has said it was well settled that the “right of any major individual to marry the...

'मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देऊ नको', महात्मा फुले समता परिषदेचं आंदोलन, जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

'मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देऊ नको', महात्मा फुले समता परिषदेचं आंदोलन, जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन Source link

China First Robot Spacecraft Venture Effectively Touched Down On The Lunar Floor Of Moon Accumulating Samples And Go back To Earth – चांद की...

पढ़ें अमर उजाला ई-पेपर कहीं भी, कभी भी। *Yearly subscription for just ₹299 Limited Period Offer. HURRY UP! ख़बर सुनें ख़बर सुनें चीन का मानवरहित...

Puerto Rico’s Iconic Arecibo Telescope That Starred In James Bond Movie Collapses

<!-- -->Photographs showed the remains of the telescope instruments scattered across the site.Arecibo: The celebrated Arecibo Observatory telescope in Puerto Rico, which once...