Uddhav Thackeray: Uddhav Thackeray: अनलॉकसाठी आहे ‘ही’ त्रिसुत्री; CM ठाकरेंनी सांगितले पुढचे धोके! – coronavirus patients may increase during unlock process says uddhav thackeray


मुंबई: माझे कुटुंब माझी जबाबदारी‘ मोहिमेमुळे महाराष्ट्राचा हेल्थ मॅप तयार करण्यास मदत होणार असून त्याद्वारे सुदृढ आणि निरोगी महाराष्ट्राचे निर्माण करणे शक्य होणार असल्याचा विश्वास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला. ( CM Uddhav Thackeray On Coronavirus In Maharashtra )

वाचा: बापरे! राज्यात रुग्णसंख्येने ओलांडला १३ लाखांचा टप्पा; करोनामृत्यूचे तांडव सुरूच

‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ या मोहिमेची राज्यभर अंमलबजावणी सुरू झाली असून स्वयंसेवक, आरोग्य कर्मचारी, आशा वर्कर्स, अंगणवाडी सेविका घरोघरी जाऊन लोकांच्या आरोग्य विषयक माहितीचे संकलन करत आहेत. लोकांच्या आरोग्याची माहिती घेत आहेत. यामध्ये करोना बाधित, बरे झालेले रुग्ण, त्यांची बरे झाल्यानंतरची स्थिती याबाबत माहिती संकलित केली जात आहे. लोकांना असलेल्या इतर आजारांची, त्यांच्या आरोग्यविषयक स्थितीचीही माहिती घेतली जात आहे. या अनुषंगाने मुख्यमंत्री ठाकरे यांनी आज त्यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे कोकण आणि पुणे विभागाचा करोना विषयक आढावा घेतला. यावेळी त्यांनी महत्त्वाचे मार्गदर्शन केले.

वाचा: देशात करोना संपला का?; बिहार निवडणुकीवर शिवसेनेचा सवाल

अनलॉक प्रक्रियेमध्ये आता दळणवळण आणि नियमित व्यवहार सुरु झाले असल्याने करोना विषाणुचा प्रादुर्भाव वाढण्याचा धोका आहे. हे लक्षात घेऊन मास्क लावणे, शारीरिक अंतर राखणे आणि हात स्वच्छ ठेवणे या त्रिसुत्रीचे काटेकोर पालन करायला हवे, त्यादृष्टीने लोकांची जीवनशैली बदलण्यासाठी मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यात यावी, मोहिमेत राज्यातील जनतेला मोठ्या प्रमाणात सहभागी करून घेऊन मोहिमेला लोकचळवळीचे स्वरूप द्यावे, अशा सूचनाही मुख्यमंत्र्यांनी दिल्या.

कोकण विभागात ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ ही मोहीम गाव पातळीपर्यंत राबविण्यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे. करोनाला दूर ठेवून सुरक्षित राहण्यासाठी या योजनेचा निश्चित उपयोग होईल, असा विश्वासही यावेळी मुख्यमंत्री ठाकरे यांनी व्यक्त केला. वैद्यकीय अधिकाऱ्यांना ट्रीटमेंट करताना काही अडचण येत असल्यास त्यांनी टास्क फोर्सशी सल्लामसलत करावी, अशी सूचनाही मुख्यमंत्र्यांनी केली. कोकण विभागात ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदूर्ग या जिल्ह्यांमध्ये सरासरी २५ टक्के आरोग्य सर्वेक्षण पूर्ण झाले आहे. याबाबात मुख्यमंत्र्यांनी समाधान व्यक्त केले. यावेळी राज्यमंत्री आदिती तटकरे यांनीही मार्गदर्शन केले.

वाचा: एक लाखाचे बिल; तीन लाख भरले असतानाही मृतदेह रोखला!

पुणे विभागातील पाच जिल्ह्यांचाही मुख्यमंत्र्यांनी आढावा घेतला. यावेळी उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार, सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री तथा जलसंपदा मंत्री जयंत पाटील, सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री तथा सहकार मंत्री बाळासाहेब पाटील, सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा गृहराज्यमंत्री सतेज पाटील व जिल्हाधिकारी सहभागी झाले होते.

जनतेचा सहभाग आवश्यक

करोनाचा मुकाबला करण्यासाठी आपल्याला एका निश्चित मार्गाने जावे लागणार आहे. कोणतीही मोहीम यशस्वी होण्यासाठी त्यामध्ये जनतेचा सहभाग मोठ्या प्रमाणात असायला हवा. करोनावरील लस उपलब्ध होईल तेव्हा होईल, पण तोवर आपण उपचार पद्धती, जनजागृती याद्वारे या संकटाचा प्रभावीपणे सामना करायचा आहे. समाजामध्ये दोन प्रकारचे लोक दिसत आहेत. मनात प्रचंड भीती असलेले आणि दुसरे बेपर्वाईने वागणारे. ही मंडळी मास्कच वापरत नाही आणि सोशल डिस्टन्सिंगही राखत नाही, असे लक्षात आले आहे. हा बेजबाबदारपणा इतरांसाठी घातक ठरू शकतो, याचे भान राखले गेले पाहिजे. त्याची त्यांना जाणीव करून दिली गेली पाहिजे, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

वाचा: एकनाथ शिंदेंना करोना झाल्याचं समजताच आदित्य ठाकरे यांनी केलं ‘हे’ ट्वीटSource link

Related Articles

Bhindi Value 40 Rupees In The Marketplace, However Farmers Are Getting 1 Rupee – बाजार में भिंडी 40 रुपये किलो, लेकिन किसानों को मिल...

पढ़ें अमर उजाला ई-पेपर कहीं भी, कभी भी। *Yearly subscription for just ₹299 Limited Period Offer. HURRY UP! ख़बर सुनें ख़बर सुनें कोरोना के चलते...

Heavy snow fall in Jammu and Kashmir resulted in delightful climate, choice of vacationers began expanding | कश्मीर ने ओढ़ी बर्फ की सफेद चादर,...

श्रीनगर: कश्मीर (Jammu and Kashmir) में भारी बर्फबारी (Snowfall) के बाद मौसम सुहाना हो गया है. गुलमर्ग समेत कश्मीर के सभी पर्यटन स्थल...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

20,764FansLike
2,446FollowersFollow
16,800SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles

Bhindi Value 40 Rupees In The Marketplace, However Farmers Are Getting 1 Rupee – बाजार में भिंडी 40 रुपये किलो, लेकिन किसानों को मिल...

पढ़ें अमर उजाला ई-पेपर कहीं भी, कभी भी। *Yearly subscription for just ₹299 Limited Period Offer. HURRY UP! ख़बर सुनें ख़बर सुनें कोरोना के चलते...

Heavy snow fall in Jammu and Kashmir resulted in delightful climate, choice of vacationers began expanding | कश्मीर ने ओढ़ी बर्फ की सफेद चादर,...

श्रीनगर: कश्मीर (Jammu and Kashmir) में भारी बर्फबारी (Snowfall) के बाद मौसम सुहाना हो गया है. गुलमर्ग समेत कश्मीर के सभी पर्यटन स्थल...

Shefali Shah’s Epic Response After Delhi Crime’s Giant Win

<!-- -->International Emmys 2020: Shefali Shah in Delhi Crime. (Image courtesy: shefalishahofficial )HighlightsShefali shared a snippet from the award show She wrote: "OMG,...

coronavirus in mumbai: Coronavirus: मुंबई करोनाची दुसरी लाट रोखणार?; आठव्या दिवशी मिळाले शुभसंकेत! – mumbai stories 800 new covid19 circumstances 372 recoveries and 14...

मुंबई: करोनाच्या दुसऱ्या लाटेचे संकट महाराष्ट्रावर घोंगावत असताना राजधानी मुंबईतील आजचे आकडे काहीसा दिलासा देणारे ठरले आहेत. मुंबईत दैनंदिन करोना बाधित रुग्णांचा आकडा...